सोमवार, डिसेंबर ३१, २००७

निवडक २००७

  1. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्री. अरूण साधू यांच्या भाषणाचे अवलोकन आणि माझी टीपणे: येथे. हे भाषण ऐकायला जातानाच मी कागद-पेन घेऊन गेलो होतो. एका चांगल्या भाषणाचे संकेत आधीपासूनच होते, त्यावर मला भाष्य करण्याची संधी दिल्याबद्दल ब्लॉगरचे आभार :p
  2. नेमेचि येतो पावसाळा, आणि त्याबरोबरच येतात पूर, सर्दी आणि चिखलाने भरलेल्या चपला! पावसाळा या विषयावरचा "शाळबोध" निबंध: येथे. विनोदी लेखन करून खो-खो हसवणारे, गडाबडा लोळवणारे काही लेखक असतात, आणि काही एखादं वाक्य असं टाकून जातात की पुढची दोन वाक्यं गेल्यावर त्यावरती स्मितहास्य उमटतं. मला आवडते ती ही दुसरी शैली. "भाताला दुप्पट पाणी लागते, ते पाऊस देतो" हे माझं सर्वांत आवडतं मनोरंजक वाक्यं!
  3. आठवणींत रमून जायला कोणाला आवडणार नाही? त्याही बालपणीच्या सुखाच्या काळातल्या! मी गिन्नी नामक माझ्या "लुप्त"छंदाच्या आठवणी लिहिल्या: येथे. श्लेष करण्याची संधी मी सहजासहजी चुकवत नाही. या थोड्या हळव्या म्हणता येईल अशा वाक्यातही ते करून दाखवणं मला जमेल असं वाटलं नव्हतं खरं, पण ते घडून गेलं: "जीवापाड जपलेल्या अशा काही गोष्टी नाहिश्या होतात - परत कधीही न मिळण्यासाठी. हरवतात तेव्हा त्या अनमोल असतात ख-या; पुढे काळाची पुटं त्यावर चढतात आणि त्या सोनेरी आठवणी काळवंडून जातात. जखमांवर खपल्या चढतात ख-या; पण व्रण मात्र कायमचेच!"
या व्यतिरीक्त बरीच छोटी-छोटी "पोस्टं" झाली. त्यातली विशेष आवडलेली: रविवार दुपारआम्ही करायचं तरी काय?नवकाव्यचकलीयह मज़धार आदी.

तुम्हा सगळ्यांना इ.स. २००८ हे लीप वर्ष सुखासमाधानाचे, हास्यविनोदाचे, विविध खेळ-स्पर्धांमधल्या उत्तम प्रदर्शनाचे, महान लेखन-वाचनसंधींनी युक्त आणि एकंदरीत सौहार्दाचे असे जाओ!

३ टिप्पण्या:

Yogesh म्हणाले...

नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुमचे खुसखुशीत लेख असेच वाचायला मिळोत.

.. म्हणाले...

आज काही उद्योग नव्हता तेव्हा तुझा ब्लॉग वाचून काढला.
"उगाच"च लिहायचे म्हणून लिहीत नाही .. खरंच सुरेख लिहितोस!
:)

Sagar म्हणाले...

saheb tumhi 2007 madhe ajoon ek blog chalu kelat tya baddal liha ki