बुधवार, मे १३, २००९

दम’दाटी’!

काल आमची हो.ही.* म्हणाली, "अरे हो, सांगत्येय, जरा दम धर!". आम्हाला अगदी म्हणजे अगदी रहावलं नाही. उत्तरलो, "हो, आता तू दम दिलास ना, मग (तो) धरायलाच पाहिजे!"

मराठीतल्या अशाच चित्रविचित्र वाक्प्रयोगांमुळे आपली भाषा इतकी मजेदार झाली आहे.

एका दमात असे काही शब्द आठवले मग एकदम लिहून काढावसं वाटलं!
- दमडी
- मुकादम (न बोलता दम भरणारा अधिकारी!)
- खायचा दम, द्यायचा दम, भरायचा दम
- नल आणि दमयंती!
- मदमस्त :-)
- दुर्दम्य

तुम्हाला सुचतंय का आणि काही?

---
हो. ही.: "होणारी ही"!

८ टिप्पण्या:

Rohit म्हणाले...

जो वाजीवातो तो कदम आनी जे वाजीवातो ती रीदम!

Nile म्हणाले...

एका दमा'त वाचला, दम लागला पण लेख दमदार झाला आहे! ;)

veerendra म्हणाले...

dam alu ..

Yawning Dog म्हणाले...

हा हा हा, दमदार झाले आहे !

Asha Joglekar म्हणाले...

एकदम मस्त. पण दमदाटी करायला दमछाक होते हल्ली.

Piyush Sarode म्हणाले...

दम दमा दम!
दमा!

Nandan म्हणाले...

be-dam?

Snehal म्हणाले...

Bhau, jara dama daman' ghya..