मंगळवार, जुलै २९, २००८

खादंती

नुकताच एका ग्रीक रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. "बाबा गनूश" इत्यादी मेन्यूही छान होता वाचायला दिलेला. तिथे गेल्यावर "व्हॉट इज हॉट" असं विचारायची हुक्की झाली, पण बाहेरची हवा (आणि वेट्रेस!) सोडल्यास गरम म्हणावं असं काही तिथे दिसेना.

अचानक एक "भयंकर" कॅटेगरीतलं संगीत (!) सुरू झालं. मित्राला म्हणालो, "हे फारच झालं--- This music sounds totally Greek to me!"

त्यावरून काही खाद्य-विनोद सुचले. ते ऐकून 'पकला' नाहीत तर कळवा!
  • एकच वांगं लागणा-या वांग्याच्या जातीला काय म्हणाल? "एक-प्लांट" (हा स्टार्टर समजा!). असं एगप्लांट खाऊन पोटात दुखलं नाही तरच मिळवली.
  • आता दोन कठीण प्रश्न:-
  • खूप जास्त (पण अगदी चवीनं) च्यूईंग गम चघळणा-याला काय म्हणाल? (अमेरीकन लोकांत हे फारच फॅड आहे): चावट.
  • ग्रीक (मेडेटेरियन) (प्र)देशातल्या पीटा ब्रेडबद्द्ल कदाचित तुम्हाला ठाऊक असेल-नसेल. हा एक चविष्ट ब्रेड असतो. खूप खपून बनवलेल्या पीटा ब्रेडला काय म्हणाल? - आटापीटा.
  • असं कुठल्या पेयाचं व्यसन आहे, जे नावानीच सांगत असूनही लोकांकडून सुटत नाही? (पुन्हा, अमेरीकन लोकांत हे फार दिसून येतं)- सोडा!

२ टिप्पण्या:

Sheetal Kamat म्हणाले...

you have recieved an award :) Checkout my blog :)

sahdeV म्हणाले...

Nice blog, came to know about it from Nilesh (Badwe) :)

Btw, this post reminded me of one of the posts on my blog (लहरी short quotes -Part3!)
i.e.
कसा विरोधाभास आहे हा पहा! अट्टल बेवडा आणि दारुबंदी चळवळीचा कार्यकर्ता, दोघांचिही --अगदी कळकळीची मागणी एकच! "दारू सोडा"!!!!

Happy blogging!!!!! :)