शुक्रवार, नोव्हेंबर ३०, २००७

प्रकाशझोतात!

स्वतःच स्वतःची (खोटी तर त्याहून नाही) स्तुती करू नये हा एक जगमान्य संकेत आहे. पण जग करेल तसंच मी केलं तर मग माझ्याबद्दल सांगण्यासारखं असं काय उरलं? म्हणजे, उरलं पाहिजेच असा आग्रह नाही; पण उरत असेल तर त्यास हरकत का असावी? आपल्यासाठी कोणाला भाट म्हणून नेमला असो किंवा नसो, स्वतःच्या उत्तम पराक्रमांबद्दल अगदी बिन-बोभाट सांगावं, काय?

याच सरधोपट न्यायाने, आज मी माझी स्तुती करण्याचे योजिले आहे. [आता यास कोणाला वेगळा (लाल) रंग चढवायचा असेल तर खुशाल रंगरंगोटी करावी!]. आज सकाळी सकाळी कुणी कुलकर्णी नामक भल्या व्यक्तिने मला (माझाच) फोटो मागितला. आणि तसं करण्याआधी एक अधोरेखित लिंकही पाठवून दिली: ती इथे आहे. आपल्याबद्दल असं काही छापून येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं (आणि आजकाल तर ऑफिसच्या कामामुळे फार उशीर होतोय झोपायला). पण काही गोष्टी स्वप्नांत यायच्या आधी डायरेक्ट सत्यातच येतात. तसंच हेही घडलं.

आता कुणी माझा फोटो नीट न्याहाळत, "काय करता?" असं विचारलं तर रद्दी झालेल्या या वेबपेजकडे री-डायरेक्ट करून लिखित पुराव्यानिशी मी शाबूत करू शकीन, आणि मोठ्या अभिमानाने सांगीन, "मी टायपिंग करतो!!!"

४ टिप्पण्या:

Nandan म्हणाले...

congrats! farmaas farceM chi aaThavaN zali :)

Surendra म्हणाले...

Photo nay lavla ki!

Yogesh म्हणाले...

congrats. haa lekh ushira vachala.
bahudha tujhya blog la khoop hits asalyamule tujha blog amachyakade blocked ahe. google reader mdhoon hi post chukali hoti ki kaay.

Sagar म्हणाले...

Aabhinandan... tu changale lihatos hyat kahi vaadach nahi..

Yuva blog moderator saheb... :) jara tya blog kade pan laksha rahudya....