मंगळवार, ऑगस्ट ०७, २००७

उत्स्फूर्त

Impromptu ला मराठीत उत्स्फूर्त असा शब्द आहे (किंवा तुम्हाला आवडत असेल तर उत्स्फूर्तला इंग्लिशमध्ये impromptu असा).

ते काहीही असो. याचं उत्तम उदाहरण ऐकायचं असेल, तर इथे पहा. पुलं एकदा डॉ. वसंतराव देशपांड्यांना पेटीची साथ करायला गेले असताना कार्यक्रमाच्या संयोजकांनी (म्हणजे पुलंच्या स्नेहींनीच) त्यांना भाषण करण्याची 'रिक्वेष्टं' केली. तेव्हा केलेल्या उत्स्फूर्त भाषणाचे हे रेकॉर्डींग. आणि दुधात साखर म्हणजे, त्यानंतर वसंतरावांचं गाणं आणि त्याला पुलंच्या पेटीची तोडीची साथ!

३ टिप्पण्या:

Nandan म्हणाले...

wa! pu lancha taruNapaNeecha aawaaj, utsphoort vinod, vasantaravaancha gaaNa -- aikoon kananche paaraNe fiTale :). Pulanchya bhaaShaNaatale kahi kahi shabda hashaa-TaaLyaant buDoon gelet, paN tyaamuLe maifaleet basoon aikalyachaa feel yetoy. Anek dhanyawaad :)

Yogesh म्हणाले...

अजित,
नंदनने ही लिंक मला दिली. आणि आत्ता तुझा ब्लॉग पाहिला.

शेअर केल्याबद्दल खूप धन्यवाद. :)

Ajit म्हणाले...

नंदन, योगेश, हे 'भाषण' उच्च आहेच!

आणि योगेश, 'शेअर'बद्दलच म्हणशील, तर मला या track चं काही भांडवल करायचे नाहिये :p