गुरुवार, ऑगस्ट ०९, २००७

दोन उगाच-कथा

मे. गोकुळदास भगवानदास पटेल यांचं किराणा आणि भुसार (म्हणजे नक्की काय ते माहिती नाही) मालाचं दुकान भगवानदास भोलाराम पटेल मार्गावर सापडेल. हे दुकान अत्यंत स्वच्छ कारभारासाठी प्रसिध्द होतं (आणि आहेही). कुठल्याही मालाची गॅरेंटी स्वतः शेठ तुम्हाला देतील. या दुकानाच्या अवघ्या इतिहासात केवळ एकदा निकृष्ट माल सापडल्याची कथा सांगितली जाते. कधी काळी म्हणे एकदा कुठल्यातरी भामट्या लघु-उद्योजकाने पटेलशेठला अगदी खराब गूळ पुरवला. किंमत मात्र चोख मोजून घेतली होती. पटेलशेठच्या लक्षात ही चूक यायला तसा बराच वेळ लागला -- म्हणजे गि-हाईकाने तो विकत घेऊन मग त्याचं काही करून बघितल्याशिवाय कळणार कसं? गि-हाईकांकडून तक्रारी ऐकू आल्यावर त्याने त्या गूळाचे पैसे परत केलेच पण पुन्हा कधी असं होऊ न देण्याची जणू काही शपथच घेतली. नफा हे उद्दीष्टासाठीच धंदा करणा-या पटेलशेठला कोणीतरी म्हणाले की काय असा गूळ तुम्ही फुकट कसा दिला लोकांना? त्यावर पटेलशेठ काय उत्तरले असावेत?

"अहो चालायचंच--- तो गूळ बंडलच होता. त्यामुळे मी काही किंमत घेतली नाही त्याची. म्हणूनच गि-हाईकांसाठी इट वॉज गूड् फॉर नथिंग!"

---

जर तुम्ही शेतात भरपूर वाल लावले आणि भरपूर पीक आलंसुध्दा, तर पहिल्या वालाच्या शेंगेला तुम्ही काय म्हणाल?

highlight --> अग्रवाल

नंदनच्या कॉमेंटप्रमाणे, जर वालाचं उत्तम पीक आलं तर त्यास काय म्हणाल?
highlight --> मस्तवाल

वालाचं शेत जर ओस पडलं तर त्यास काय म्हणाल?
highlight --> ओस्वाल

वालाच्या मोठ्या दुकानाला काय म्हणाल?
highlight --> वाल-मार्ट

वालाच्या भावाची चौकशी काय विचारून कराल?
highlight --> स-वाल

वालाची कमी मसाला घालून, बिन-मिरचीची भाजी केली तर त्यास काय म्हणाल?
highlight --> म-वाल

हे सगळं वालाचं रामायण लिहिणा-या माझ्यासारख्या कॅरेक्टरला काय म्हणाल?
highlight --> वाल्मिकी!

तुम्हीही सुचवू शकता...!

११ टिप्पण्या:

Nandan म्हणाले...

:D, shivaay vaalachya tyaa bharghos pikala 'mastvaal' mhaNata yeil :)

अनामित म्हणाले...

Vaalacha shet os padala tar tyala kay mhanal??
Ans : Oswal :)))
Soppa aahe ekdum..
-Amruta

Priyabhashini म्हणाले...

गाणं म्हणणार्‍या कावळ्याला काय म्हणाल?

कव्वाल

Ajit म्हणाले...

हे सगळं वालाचं रामायण लिहिणा-या माझ्यासारख्या कार्टून कॅरेक्टरला काय म्हणाल? ---> वाल्मिकी!

Nandan म्हणाले...

baraach moThaa aha'waal' zala ki :)

Nandan म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Devendra म्हणाले...

ज्या प्रांतात वाल फक्त किल्ल्यातच पिकवले जातात तो कोणता?

गढवाल

गटारी अमावस्येच्या निमित्ताने:
या प्राण्याचा रस्सा वाल घालून चांगला लागेल बहुधा:

वालरस


असे नगर जिथे वाल थोडेच उगवतात पण Engineering College मात्र आहे.

वालचन्दनगर (चन्द वालॊंका नगर)

द्रविडला आवडणारा वाल:

The Waal

- देवेंद्र

Yogesh म्हणाले...

he sagale vachun vachak kay karnar?

kawaal :)

Milind म्हणाले...

:D
हसून हसून ह'वाल'दील!

अनामित म्हणाले...

valacha
ramayan lihinara..
valchand
nagarcha ...
dhyanchand..

deepanjali म्हणाले...

जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर (www.blogadda.com)