गुरुवार, जुलै २६, २००७

एकादशी

एकादशी नि दुप्पट खाशी म्हणतात ते काही खोटं नाही. आषाढी एकादशीच्या या सुदिनी विंदांची एक खाशी मस्तच बालकविता आठवली ती अशी---

पंढरपूरच्या वेशीवरती आहे एक शाळा
सगळी मुले गोरी मात्र
एक आहे काळा

दंगा करतो फार, खोड्या काढण्यात अट्टल,
मारायचे कसे, मास्तर म्हणतात,
असायचा विठ्ठल!

३ टिप्पण्या:

अपर्णा म्हणाले...

वा! काय मस्त कविता आहे! छोटीशी आणि गोड एकदम!

Yogesh म्हणाले...

हा हा... सही आहे.

हॅप्पी आषाढी एकादशी ;)
(असा एक एसेमेस मला आला)

अनामित म्हणाले...

mazya mate ti windanchi balakawita ashi aahe -

panDharapurachya weliwarati
aahe ek shaLaa
sagaLee mule goree
ek maatra kaaLaa

dangaa karato faar
khoDya karaNyaat aTTaL
maaraayache kase
mastar mhaNataat
asaayacha wiThThal..

tu pustakat pahun lihilis ka?

Bee