का. ना. घ. तज्ज्ञाच्या क्लिनिकमध्ये:
कृपया डॉक्टरांशी फीबाबत घसाघीस करू नये.बालरोगतज्ज्ञाच्या क्लिनिकमध्ये:
येथे केसांच्या समस्यांवर इलाज केला जात नाही. त्यासाठी त्वचारोगतज्ज्ञांना भेटावे.पोटाच्या डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये:
प्रतिस्पर्ध्याच्या यशामुळे आपल्या पोटात दुखत असेल तर त्यासाठी इथे औषध मिळणार नाही.मानसोपचार तज्ज्ञाच्या क्लिनिकमध्ये:
मनुष्यस्वभावाला औषध नाही!डोळ्यांच्या डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये:
नजरबंदीवर डोळ्यांत तेल घालणे हा उपाय नाही हे ध्यानात असू द्या.... आणि भूलतज्ज्ञाच्या क्लिनिकमध्ये:
आमचे येथे रोग्यांची दिशाभूल मुळीच केली जात नाही; परंतु चूक-भूल देणे घेणे.हाडाच्या डॉक्टरांना मात्र अशा पाट्यांची गरजच पडली नाही!
४ टिप्पण्या:
हाडाच्या डॉक्टरांना मात्र अशा पाट्यांची गरजच पडली नाही! :D
वाह! भारी आहेत पाट्या! ख-याखु-या आहेत की केवळ कल्पनाशक्ती? पण पुण्यात नक्की असू शकतील अशा पाट्या!
'Shala' (Milind Bokil) saathi google search maartana tumchya blog var aale.. lekhan shaili aawadli aani vishay ruchle :)
tumhala majhya blogroll var add keli tar harkat nasel i hope!
IIT Kanpur चे Health Center ह्या बाबतीत आम्हा विद्यार्थ्यांमध्ये नामांकित आहे.
तिथे म्हणे पोट दुखत असलं की Iodex देतात!!!
टिप्पणी पोस्ट करा