मंगळवार, जानेवारी ०२, २००७

दवा खाना

दवाखान्यातील गंभीर वातावरण हलके करण्यासाठी काही डॉक्टरांनी शक्कल लढवून खालील पाट्यांची उपाय योजना केली!

का. ना. घ. तज्ज्ञाच्या क्लिनिकमध्ये:
कृपया डॉक्टरांशी फीबाबत घसाघीस करू नये.
बालरोगतज्ज्ञाच्या क्लिनिकमध्ये:
येथे केसांच्या समस्यांवर इलाज केला जात नाही. त्यासाठी त्वचारोगतज्ज्ञांना भेटावे.
पोटाच्या डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये:
प्रतिस्पर्ध्याच्या यशामुळे आपल्या पोटात दुखत असेल तर त्यासाठी इथे औषध मिळणार नाही.
मानसोपचार तज्ज्ञाच्या क्लिनिकमध्ये:
मनुष्यस्वभावाला औषध नाही!
डोळ्यांच्या डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये:
नजरबंदीवर डोळ्यांत तेल घालणे हा उपाय नाही हे ध्यानात असू द्या.
... आणि भूलतज्ज्ञाच्या क्लिनिकमध्ये:
आमचे येथे रोग्यांची दिशाभूल मुळीच केली जात नाही; परंतु चूक-भूल देणे घेणे.
हाडाच्या डॉक्टरांना मात्र अशा पाट्यांची गरजच पडली नाही!

४ टिप्पण्या:

Nandan म्हणाले...

हाडाच्या डॉक्टरांना मात्र अशा पाट्यांची गरजच पडली नाही! :D

Prasad Chaphekar म्हणाले...

वाह! भारी आहेत पाट्या! ख-याखु-या आहेत की केवळ कल्पनाशक्ती? पण पुण्यात नक्की असू शकतील अशा पाट्या!

suparna म्हणाले...

'Shala' (Milind Bokil) saathi google search maartana tumchya blog var aale.. lekhan shaili aawadli aani vishay ruchle :)

tumhala majhya blogroll var add keli tar harkat nasel i hope!

Shashank म्हणाले...

IIT Kanpur चे Health Center ह्या बाबतीत आम्हा विद्यार्थ्यांमध्ये नामांकित आहे.
तिथे म्हणे पोट दुखत असलं की Iodex देतात!!!