गुरुवार, डिसेंबर ०७, २००६

'गोळी'बार

मराठी आणि इंग्रजी भाषेतले काही फरक मजेशीर आहेत.

मराठीत आजारी पडलो, तर आपण आपला आजार डॉक्टरांना दाखवतो.
आणि इंग्रजीत आजारी पडलो तर मात्र आपण डॉक्टरांना बघतो!

To see a doctor = डॉक्टरांना दाखवणे ! एकेका भाषेच्या वापराचं खास वेगळेपणच, नाही का?

-=-=-=-=-

कानडीमध्ये मराठीतले बरेच शब्द आहेत; पण त्यांचे अर्थ मात्र थोडे वेगळे-
  • पर्वा इल्ला - म्हणजे "हरकत नाही". पर्वा नाही अशा मराठीतल्या अर्थाने हे expression कानडीत वापरत नाहीत.
  • "गण्य" हा शब्द मराठीत न'गण्य' अशा स्वरूपात थोड्या नकारात्मक अर्थाने वापरला जातो (आणि बऱ्याचदा अग्रगण्य म्हणूनही). कानडीतली फक्त 'गण्य' व्यक्ती, ही मोठी मानाची व्यक्ती समजली जाते.
  • कानडीत 'रजा' म्हणजे सुट्टी. काही कारणाने मारलेली बुट्टी नव्हे!
-=-=-=-=-

अजून एक:
आपल्याला जर कोणी 'डोळा मारला' तर मग आपल्याला [तो] 'डोळा लागतो' का?

-=-=-=-=-

अशा बऱ्याच गमती; अजून सापडल्या तर लिहिनच इथे...

४ टिप्पण्या:

Sumedha म्हणाले...

मराठीमधे आपण परीक्षा देतो, इंग्रजी मधे घेतो :)

Il Magnifico म्हणाले...

कानडीत हत्ती म्हणजे कापूस. माझी आजी नेहमी 'हत्तीच्या वाती करते' म्हणून आम्हाला बुचकळ्यात टाकायची :-)

Satyajeet म्हणाले...

hindimadhe darshak mhanje prekshak. kaay gachal bhasha aahe!

अनामित म्हणाले...

भंगार म्हणजे कानडीत सोनं
सोप्पंय म्हणजे कानडीत भाज्या

दारावरुन भाजीवाला "सोप्पंय" ओरडत गेला की जणु परिक्षेला जाणा-या मुलांना धीर देत जातोय की काय असे वाटते (ः-))