बुधवार, नोव्हेंबर ०१, २००६

वांग्याचे काप

साहित्य: पाव किलो वांगी, डाळीचे पीठ, मीठ, गोडे तेल.
इतर साहित्य: सुरी, तवा, ताटली, गॅस, लायटर इत्यादी.
आवश्यक : मोकळा वेळ आणि उत्साह.

कृती: बाजारतून वांगी विकत आणा. ती चांगली धुऊन, त्यांचे उभे, पातळ काप करा. डाळीच्या पीठात ते काप घोळून एक पीठाचा एक थर त्यावर तयार करा. तवा गॅसवर ठेवा, चांगला तापल्यावर थोडे तेल तव्यावर घ्या. आपल्या वजनाच्या व्यस्त प्रमाणात तेल वापरणे प्रकृतीच्या दृष्टीने श्रेयस्कर. तेल तापले की वांग्याचे काप त्यावर चांगले खरपूस परतून घ्या. शेवटी चवीप्रमाणे मीठ त्यावर 'पेरा'.

आणि मग गरम गरम ते काप खाऊन टाका!

करायला सोपी कृती, आणि चवीलाही झकास.

---
वांग्याची 'परतून' भाजी केली, तर त्या पाककृतीला इंग्रजीत काय म्हणाल?
"Return of the Egg plant" :-)

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

Try mixing rice floor with Daliche Peeth, makes it crispier.

Return of the eggplant, good one.

Mahesh

अनामित म्हणाले...

Daaliche peeth korde thewayche ki bhajyachya peethasarkhe pani ghalayche tyat?