सोमवार, ऑक्टोबर ३०, २००६

संपूर्ण

संस्कृतातला श्लोक आठवतोय का? पूर्णा‍‌‍त् पूर्णमिदं... खोलात गेलो तर समजायला महाकठीण. पूर्णात पूर्ण सामावलेले आहे, पूर्णातून पूर्ण काढून घेतले तरी पूर्णच उरते अशी ही अनंत आणि 'पूर्णा'ची कल्पना आहे. इंग्रजीतला infinity minus infinity equals infinity हा सिध्दांत त्याच कल्पनेला दुजोरा देणारा आहे.

समजायला सोप्पं असं याच श्लोकाचं दुसरं रुप असू शकतं ते म्हणजे,
अपूर्णात अपूर्ण पूर्णपणे सामावलेले आहे. अपूर्णातून अपूर्ण काढून घेतले तरी उरते ते अपूर्णच.

आणि नुसताच time pass नाही तर यातूनही विचार करायला लावणारा अर्थ निघू शकतो.
बघा पुन्हा वाचून; पटलं आता?

---
पुरणात पुरण सामावलेले आहे, हे खरे; पण ते अपूर्ण सत्य. संपूर्ण पुरणपोळीत पुरण पूर्ण सामावलेले आहे; हे खरे सत्य.

हो. पुरे करतो आता!

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

अरेच्या! एका नपुणेकराला मी कसे काय पुणेकर समजले! Sorry बरका! Mia Culpa!

हे तुमचे पुरणाचे कडबु स्वादिष्ट झाले आहे!

सध्या पाककलेत मुलुखगिरीचा मनसुबा दिसतोय.