गुरुवार, नोव्हेंबर ०९, २००६

जो जे...

ज्ञानेश्वरांनी पसायदानात अशी इच्छा व्यक्त केली आहे:
दुरितांचे तिमिर जाओ। विश्व स्वधर्मे सुर्ये पाहो।
जो जे वांछील तो ते लाहो। प्राणिजात॥
ज्याला जे हवे ते मिळणे हे महाकठीण. एकाला जे हवे ते दुसऱ्याला नको. तिसऱ्याला नको ते पाचव्याला मात्र पसंत; मात्र दुसऱ्याला ते पाचव्याला मिळायला नको असे वाटणार. या सगळ्या भानगडीत जो जे वांछील त्याला ते ते कसे मिळणार? आणि ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेली ही इच्छा तरी कशी पूर्ण होणार (स्वतः ज्ञानेश्वरही 'जो जे वांछील' या गटात बसतात!)

ज्ञानेश्वरांच्या या प्रख्यात ओळी पुन्हा पुन्हा वाचल्यावर मला multi-variable optimization या linear/non-linear programming मधल्या प्रकरणाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही! गणिताच्या दृष्टीने हे सगळे प्रश्न computer वापरून थोड्या परिश्रमानंतर आणि बऱ्याच वेळानंतर सुटू शकतील. परंतु ज्ञानेश्वरांने जे इप्सित आहे ते प्रत्यक्ष आयुष्यात अशक्यप्रायच वाटतंय. खरं सांगायचं तर प्रत्यक्ष आयुष्यात असं काही सुटेलच असं नाही. कारण आयुष्यातली 'multi' variables नुसती multi नसतात, तर (दुर्दैवाने?) जवळजवळ अनंतच असतात.

सोडवायला प्रश्न उरले नसते, तर माझ्यासारख्या engineer ला नोकरीच उरली नसती. नोकरीचं सोडा; पण सगळेच प्रश्न सुटत नाहीत म्हणूनच तर खरी मजा आहे. Right?

३ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

Right!

"या सगळ्या भानगडीत जो जे वांछील त्याला ते ते कसे मिळणार?".. खरे आहे, म्हणूनच फक्‍त प्रार्थना करायची न? तुझे "सगळे" प्रश्न सुटो ही सदिच्छा!

Vishwanath म्हणाले...

@ ajit / sumedha (I dont know exactly who has posted this)

Just want to share a thought...

Dnyaneshwaranni "Jo je vanchil.." lihaychya aadhichya olit "Duritanche timir jao, vishwa swadharme surya paho" ase mhatlay. Tyacha arth asa ki sarva vait mansanchya vait icha, vait vichar nighun jaot ani tya nantar ase suddha zalele je lok aahet tyanchya sarva icha purna hovot...

Ref. Pravachankar Shewade.

Vishwanath

vishwanath22@hotmail.com
+91 98230 92381

Ajit म्हणाले...

श्री. विश्वनाथ,

तुमच्या मताचे स्वागत आहे.

conflicting विचार आणि views हे फक्त वाईटांमध्येच असतात हा समज चुकीचा आहे. सर्व उदात्त विचारांमध्ये सुध्दा, चांगल्या दर्जाचे मतभेद असू शकतात. त्यामुळेच विचारमंथन आणि त्यातून प्रगती शक्य होते. तसे पाहिले तर चांगले काय आणि वाईट काय हा संपूर्णतः एकेकाच्या वैयक्तिक दृष्टीकोणाचा मुद्दा आहे.

कदाचित म्हणूनच ज्ञानेश्वरांनी म्हटले तसे दुरीतांचे तिमिर गेले, तरी सगळ्यांनाच हवे तसे मिळणे अशक्यप्राय वाटतेय...