बुधवार, जून २१, २००६

मराठीत गुटेनबर्ग?

internet च्या नियमित प्रवाशांना Project Gutenberg या site बद्दल माहिती असेलच. जुन्या पुस्तकांचे digital रुपांतर करून त्यांचा उत्तम संग्रह करण्याचा हा प्रकल्प निश्चितच स्पृहणीय आहे. ज्या जुन्या पुस्तकांच्या copyright
चा कालावधी संपलेला आहे, अशी हजारो पुस्तके वाचकांसाठी पूर्णतः फुकटात उप्लब्ध आहेत. त्यांत इंग्रजीचे प्रभुत्त्व असले तरी, फ्रेंच, स्पॅनिश, ग्रीक इत्यादी भाषांमधले ग्रंथही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

मराठी पुस्तकांबद्दल म्हणायचे तर या website ची तशी वेगळी शाखा नाही. या website वर काही पुस्तके उपलब्ध आहेत; परंतु त्यापैकी काहिंच्या copyright बद्दल (उदा. कुसुमाग्रजांच्या कविता) मला शंका वाटते.

आपल्यासारख्या नियमित bloggers आणि वाचकांनीसुध्दा पुढाकार घ्यायचे ठरवले तर मराठीतली जुनी ग्रंथसंपदा internet वर आणता येईल. कदाचित अशी सोय अस्तित्त्वात असेलही, मात्र मला त्याची आत्ता तरी कल्पना नाही. आपल्यापैकी सगळ्यांकडेच अशी काही जुनी पुस्तके असतीलच, नाही?

काय म्हणता?

1 टिप्पणी:

Milind म्हणाले...

मराठी Optical character recognition वर सध्या CDAC येथे काम चालू आहे. ते झाले की हे काम अजुन सोपे होईल.
ते कसे अंमलात आणताहेत हे एका मित्राकडून ऐकायला मिळतेय..