Wednesday, June 07, 2006

कहीं दूर...

सोनेरी संध्याकाळी कुठेतरी डोंगरात सूर्य अस्तास जावा, आणि त्याने जातांना आकाशात उधळलेले रंग पाहून मन तुझ्या आठवणींनी अजूनच व्याकूळ व्हावं.

वाऱ्याची झुळूक हलकेच गुदगुल्या करून जावी आणि उगीचच खुद्कन हसू फुलावं.

अचानकच एखादी सुरेखशी कल्पना सुचावी आणि त्याच भरात शब्दही तितकेच सुंदर उमटावेत.

जवळच ठेवलेली पेटी पुढे ओढावी आणि बोटं फिरवून सूरांचे लोट काढावेत.

तुझ्या आठवणींत असा असताना, मग आपसूकच माझ्या ओठांवर गाणं यावं:

काहीं दूर जब दिन ढल जाए
सॉंझ की दुल्हन बदन चुराए
चुपकेसे आए
मेरे खयालोंके आंगन में
कोई सपनोंके दीप जलाए, दीप जलाए

कहीं दूर...


गाणं संपताना नकळतच आलेले दोन अश्रू मग हळूच पुसून टाकावेत.

तुझी आठवण येत असताना हे सारे असेच व्हावे...

5 comments:

Milind said...

तरीच सायंकाळच्या वेळेस कातरवेळ असे म्हणतात.
'कातरवेळ' असा एक धडा नववीत की दहावीत होता, आठवते का?

Ajit said...

अरे मिलिंदा,

सकाळी कटींग करायच्या वेळेला मी 'कातर'वेळ म्हणेन. काय म्हणतोस?

Milind said...

@$@&%
:) हा विनोद त्या romantic लेखाला शोभत नाही. आणि तो धडासुद्धा romantic च होता.

असो. संकल्प सुद्धा मराठी blog लिहीतो, माहीतीये का?
sankalpdravid.blogspot.com येथे...

Anonymous said...

hi just want 2 say sir
katar vel dhada 11vi la hota 10vila nahi
jyanche 11vi marathi navate tyana
he mahit nahi.

Anonymous said...

tumhala he kharach vatat hote ka?
ugich lihayache manun lihile....