गुरुवार, एप्रिल १४, २००५

एकांत

कधीकधी मला खूप दूर जावसं वाटतं. वैताग, राग काही काही वाटत नसतो. सगळं जग अगदी आहे तसं, स्थिर-स्थावर - सुखात असतं. तरीपण मला खूप दूर जावसं वाटतं.

मी आणि मी मग आम्ही दोघे फिरायला निघतो - अगदी एकटे. Main Building च्या प्रांगणात आता शुकशुकाट झालेला असतो. क्वचित एखादी सायकल समोरच्या रस्त्यावरून जाते. मागे भव्य Main Building आणि समोर टाटांचा धीरगंभीर पुतळा अशा set मध्ये मी settle होतो. तारे लुकलुकत असतात. चुकार ढगांच्या पडद्याआडून चंद्र दर्शन देतांना लाजत असतो. थंडगार वाळूवर निवांतपणे पाय पसरून मी या जगापासून केव्हाच दूर गेलेलो असतो.

अशा वेळी डोक्यात काहीही विचार नसतात. "भरून पावणे" ज्यास म्हणतात असा तो अविस्मरणीय अनुभव असतो. जवळजवळ एक शतकभर या जागेनं असंख्य लोकांना पावन केलं आहे. मी त्या भाग्यवंतांमधला एक.

ती जागा, ती वास्तू, ती वेळ, ते तारे, तो चंद्र आणि तो मी!

इतक्या साऱ्या गोष्टींच्या सहवासातही मला तो स्वर्गीय एकांत लाभतो. हो! मला आणि मला!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: