शुक्रवार, एप्रिल १५, २००५

प्रभातचित्री

पारिजातकाहूनि शुभ्र चांदण्यांकडे चित्रकाराची प्रतिभाही असेल याची मला कल्पना नव्हती.

रात्रीचा काळाभोर canvas पुढ्यात मिळताक्षणी पहा चंद्र-चांदण्यांचे चंदेरी ब्रश कसे सुरू होतात.

मी गाढ निद्रेत असताना background (की blackground) मध्ये प्रतिभेला असा बहर येतो.

पहाटे पहाटे चित्र पूर्ण झालेलं असतं. रसिकनजरेनं मी आकाशी पाहतो तेव्हा सोन्याची धूळ सर्वत्र पसरलेली असते. कोवळे सूर्यकिरणही मग आपल्या तेजाने त्या चित्राचा तजेला आधिकच खुलवतात.

माझ्या स्वप्नांची मूर्तचिन्हे त्या सोनेरी चित्रात शोधता शोधता मीही मग रंगून जातो...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: