सोमवार, एप्रिल ११, २००५

जंटलमन माणसांचा खेळ

"क्रिकेट हा खेळण्याचा खेळ नसून बोलण्याचा खेळ आहे" इति पु. ल.


"क्रिकेट हा बोलण्याचा नसून बघण्याचा खेळ आहे" इति अजित.


बंगलोरला भारत-पाकिस्तान कसोटी सामना होणार - आणि या बातमीबरोबरच मी तिकिटविक्रिच्या बातमीकडे लक्ष ठेऊन होतो. Good Friday च्या शुभमुहुर्तावर अस्मादिकांनी मग क्रिकेट प्रत्येक्ष बघण्याचा debut केला. "खरे" क्रिकेटचे मैदान किती मोठे असते याचा मला काहिच अंदाज नव्हता. वीस फूटांचा वऱ्हांडा ते ४०० मीटर्सचे ground अशा नानाविध आकारांच्या मैदानांत (आणि playing conditions मध्ये) मी क्रिकेट खेळलेलो आहे.

stadium च्या security checks मधून पार होत प्रत्यक्ष आसनावर आरूढ होताक्षणी पहिला विचार आला - "ई काय छोटं ground आहे हे!"
खेळाचा आरंभ होण्याआगोदर दोन्हीही संघ warm-up आणि थोडी net-practice करायला मैदानात उतरले. प्रेक्षकांचा आरडाओरडा वाढला की समजावे कुणितरी star खेळाडू मैदानात उतरतोय. गॉगल वगैरे लावून, sun-cream फासून आपल्या images ची काळजी घेत खेळाडू practice करत होते. अवघ्या stadium च्या नजरा त्यांना follow करीत होत्या, आणि त्याची त्यांना पूर्ण जाणीव होती. मला तर त्यांच्या कितीतरी हालचाली मोजून-मापून केल्यासारख्या वाटत होत्या.
मैदानाच्या आकाराबद्दलची निराशा आणि खेळाडूंनी मिरवलेल्या starपणाबद्दलची चीड अशा negative mindset मध्ये मग मी match बघायला सुरुवात केली. खेळपट्टीभोवतीचे दोरीचे कुंपण हटवले गेले - nets सोडून, गुंडाळून ठेवण्यात आली. प्रेक्षकांची उत्सुकता शीगेला पोहोचली, आणि मग टाळ्यांच्या कडकडाटात, ढोलांच्या गडगडटात,


पंचांचे आगमन झाले. रोमांच उभे राहणे या वाक्प्रचाराने आपले demonstration पूर्ण केले - तेवढ्यात भारतीय संघही मैदानात उतरला. आरोळ्यांनी आसमंत दुमदुमला. पाकिस्तानी फलंदाजांनी आपापले ends पकडले. bat ने खेळपट्टीचा अंदाज घेतला आणि दिवसातला पहिला चेंडू खेळण्यास तय्यार झाले.
कोणत्याही जाहिरातीचा व्यत्यय न येता खेळ अशा तऱ्हेने सुरु झाला.
TV वर match बघताना ती फारच नाट्यपूर्ण वाटते. दुरून मैदान न्याहाळताना प्रत्यक्ष खेळपट्टीवर काय घडते आहे त्याचा काहिच अंदाज लागत नाही (तीन दिवसांच्या match-बघणीनंतर मात्र मला ते तंत्र गवसले). चेंडू टोलावला गेला की मात्र स्पष्ट दिसतो. थोड्या अनुभवानंतर एखादा चेडू bat च्या खूपच जवळून गेला असावा असे जाणवते. अजून एक फरक म्हणजे TV वर ground फार मोठे वाटते. covers, square-leg लाही चेंडू गेला तरी फार दूर गेला असावा असे वाटते. इथे सगळे मैदान एकाच द्रुष्टिक्षेपात दिसत असल्यामुळे covers, square-leg, mid-on अगदी जवळ वाटतात.
दोन-दोन तासांचे तीन sessions खेळाडूंची खरी कसोटी बघत असावेत. माझ्यासारख्या नवोदित प्रेक्षकाची तरी नक्कीच! सतत इतक्या concentration ने खेळायचे आणि जिंकायचे म्हणजे कर्मकठीणच की हो.सूर्य माथ्यावर आला आणि मग हळूहळू उतरू लागला. प्रेक्षकांच्या उत्साहातला जोरही मग जरासा ओसरू लागला. कसोटी क्रिकेटला "कसोटी" किंवा "test" क्रिकेट का म्हणतात ते उमजू लागले. सकाळी इतकं छोटं वाटणारं मैदान संध्याकाळपर्यंत प्रचंड मोठं वाटू लागलं. खेळाडूंचं star पण पळालं, उरले ते फक्त प्रचंड इच्छा आणि शारिरीक शक्तीचे उमदे वीर! लहान-सहान हालचालीमधली नजाकत आक्रुष्ट करू लागली. नशा मग चढू लागली. TV वरच्या stars चा तिरस्कार वाटू लागला. प्रत्येक्ष बघण्यातला मजा मनाचा ताबा घेऊ लागला...

आता नजर पुढच्या Bangalore Test कडे! मी प्रत्यक्ष पाहिलेला पहिलाच सामना भारताने गमावला असला तरी तो सामना मी कमावलेल्या या अनुभवांमुळेच लक्षात राहिल - कायमचा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: