"आयुष्यात सुखी होण्याचे अडतीस मार्ग""सुखी होण्याचा राजमार्ग - न पटल्यास पैसे परत!"
अशा नाटकी वाक्यांची कल्पनासुद्धा विनोदी वाटते. जर अशी पुस्तके वाचून सुखी होता आलं असतं तर काय सांगता! (पण असं पुस्तक लिहिणारा लेखक सुखी झालाच असता असं खात्रीने सांगता येणार नाही) खरं म्हणजे सुख मिळवण्याच प्रयत्न करण्याअगोदर सुख म्हणजे नक्की काय याचा शोध घ्यायला हवा. दु:खं नसणं म्हणजे सुखी असणं का? काहितरी कमी असणं किंवा काही गोष्टी विनाकारण जास्त असणं म्हणजे सुखी नसणं का? एखादी गोष्ट प्रयत्नपूर्वक प्राप्त करणं यात सुख आहे, की अशी गोष्ट ताब्यात ठेवता येणं यात सुख आहे?
मी कधी सुखी असतो; आणि कधी नसतो? याची एक सोपी test मी शोधून काढली आहे. फक्त या क्षणाचा विचार करायचा - या क्षणी मी काय करतो आहे, मला काही जबाबदार्यांचं ओझं वाटतय का? पुढच्या काही दिवसांमध्ये माझी मन:स्थिती साधारणपणे कशी असणार आहे? या सगळ्यांची उत्तरं समाधानकारक मिळाली, तर आत्ता, या क्षणी मी सुखी आहे असं मी मानतो. शुक्रवारची संध्याकाळ मी नक्की सुखी असतो! synthesizer वाजवतांना मी खूष असतो. सकाळी दात घासताना मी आनंदात असतो. badminton खेळताना मी सुखी असतो. project चं काम करताना? बहुतांशी मी खूष असातो. वाचन करताना मी खरोखर enjoy करत असतो. balcony तून चांदण्यांनी डवरलेलं आकाश पाहताना मी हरखून जातो.
... आणि लिखाण करताना!
एखादी व्यक्ती जे लेखन करते ते तिच्या स्वत्वाचा एक हिस्सा असतं. मी जे लिहितो ते माझं - स्वत:चं असतं. मी अनेक गोष्टींबद्दल लिहितो; पण शेवटी ते माझे विचार असतात. मी एखाद्या व्यक्तिरेखेच्या तोंडचे संवाद लिहिले तरी ती व्यक्तिरेखा हे माझं स्वत:चं अपत्य असतं. एखाद्या गोष्टीच्या निर्मितीत जर काही सुख दडलेलं असेल तर मी ते लिखाणातून अनुभवतो. विचार ही virtual entity आहे. भौतिक जगात विचाराला size-shape-form नाही. तो माध्यमातून प्रकट व्हावा लागतो. मग ते माध्यम लेखन असेल, चित्र - रंग असतील - गायन असेल, किंवा badminton खेळणंही असू शकेल. एखादी व्यक्ती जे काही करते ते तिच्या विचारांचं भौतिक स्वरूप असतं. विचारांचं सौंदर्य - कुरुपता किंवा absence सुद्धा आचरणातून समोर येतो. एखाद्याचे विचार अनेकांच्या विचारांना चालना देतात. आणि मग orchestra सारखी harmony साधली जाते, किंवा दुसर्या टोकाला महायुध्दासारखी भीषणताही! भौतिक जगापासून प्रेरणा घेत विचारांना प्रभावी बनवलं जातं. वयाबरोबर येणारं शहाणपण हे याचंच उदाहरण आहे. काही वेळा विचारांना दडवलं जातं, मुखवटा घातला जातो. समज-गॆरसमजाच्या भानगडी निर्माण होतात. प्रश्न-उत्तरांच्या श्रुंखलाही!
विचारांना असं अनिर्बंध सोडण्यास मी उत्सुक असतो. या लिखाणातल्या खूपशा बाबी obvious असतील - पुन्हा एकदा वाचताना त्या trivial वाटतीलसुद्धा. पण ते महत्वाचं नाहिए. त्यामागचा अनुभव महत्वाचा आहे. लिखाण करताना सुचणार्या विचारांची साखळी महत्वाची आहे. तो सुसाट वेग मला खरं सुख देउन जातो. विचारांची अशी खळबळ पुन्हा स्थिर झाल्यावर एक अवर्णनीय शांतता लाभते. उत्तम चित्र रंगवल्यावर चित्रकाराचं मन ज्याप्रमाणे भरून येत असेल अगदी तसंच माझं होतं. हलकं हलकं वाटतं.
आणि असा आनंद सर्वजण कधी ना कधी अनुभवत असणारच - प्रत्येकाचे मार्ग निराळे असतील; पण सर्वदेव प्रणामं शेवटी केशवमं प्रति जसा जातो; तसा end result तोच असणार, जो मी स्वत: अनुभवतो. त्यामुळे, नक्कीच ---
"सांगा सुख म्हणजे काय असतं ?तुमचं नि आमचं सर्वांचं same असतं"
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा