विलक्षण शीण आल्यावर जी झोप लागते - तिला 'तोड' नसते. या वेळी स्वप्नं पडत नसावीत. मनातले विचार तसेच continue होतात; पण ते track करण्याचे कष्ट मेंदूला घेववत नाहित आणि हळूहळू विचार मग भरकटत जातात.
नाना फडणवीसांची एक गोष्ट आठवते. एक भाषापंडित दरबारात आलेला असतो. अनेक भाषांवर त्याचे प्रभुत्व असते. "माझी मात्रुभाषा ओळखून दाखवा" असं आव्हान तो भर दरबारात देतो. नाना ते आव्हान स्विकारतात - एक दोन दिवसांची मुदत मागून घेतात. त्या रात्री निजानिज झाल्यावर - सर्वत्र शांतता असताना, गाढ निद्रेत असलेल्या त्या पंडिताच्या अंगावर नाना थंडगार पाणी टाकायला सांगतात. "अय्यो अय्यो!" करत पंडित खडबडा जागा होतो. नानांनी त्याची मात्रुभाषा झटक्यात ओळखलेली असते!
काल संध्याकाळी काहिसं असंच झालं. पाचच्या सुमारास मला भलती गाढ झोप लागली होती. दारावर बेल वाजली आणि उठून दार उघडण्याची प्रतिक्षिप्त क्रिया माझ्याकडून सुरु झाली. "क्रिकेट खेलने आ रहा हॆ क्या?" नितिन दारात उभा होता. "अरे मला आता badminton ची match आहे; तिकडे जायचंय". मला काही समजायच्या आतच मी हे सगळं मराठीतून बोलून गेलो होतो. त्या precise क्षणी माझी झोप उघडली आणि आठवण झाली ती नाना फडणवीसांच्या त्या गोष्टीची!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा