सोमवार, सप्टेंबर २४, २००७

माझीही ग्राफिटी!

  • आपल्या मोटरसायकलच्या आरश्यात विमान मावलं म्हणजे तुम्ही आकाश जिंकलं असं नाही!
  • कोण म्हणतो महाराष्ट्र बॅंकेचा शेयर म्हणजे महा-भाग नाही?
  • बसमधून उभ्याने जाणा-या एका आजोबांचे आडनाव बसू असेल तर आपली जागा सोडून त्यांना बसू द्यावे का?
  • बॉक्सिंगच्या मॅचमध्ये म्हणे मॅच सोडायची असेल तर पंचाला "आय ऍम थ्रोईंग इन टॉवेल" असं सांगावं लागतं!
  • दारू ही आरोग्याला वाईट असूनही तिला "पेय" असे का म्हणतात?
  • मला कुठला अलंकार आवडतो? सोन्याची चैन! नाही नक्कीच नाही. माझा आवडता अलंकार म्हणजे श्लेष!
  • लिंबू सरबताच्या रसिकाला आंबटशौकीन का म्हणत नाहीत?
  • अधिक पैसे मिळवायचे असतील तर शेयर मार्केटच्या फंदात तरी पडा किंवा एखाद्या चांगल्याशा फंडात तरी!

६ टिप्पण्या:

Surendra म्हणाले...

Man, too good :-)

Yogesh म्हणाले...

सकाळला पाठव ;)

त्यांची मला आवडलेली ग्राफिटी म्हणजे "झाडावर प्रेम करा... झाडाखाली नको." ही :))

Ajit म्हणाले...

"झाडावर प्रेम करा, झाडाखाली नको"वरुन आठवलं... याचं नाट्यरुपांतर करण्याचा एक प्लॅन होता. त्यात "झाडावर प्रेम करा...नको" असं एक आजोबा एका जोडप्याला झाडतात आणि त्यानंतर ते जोडपं झाडावर जाऊन बसतं असं दाखवणार होतो :o

Milind म्हणाले...

जबरी!!
पहीली ग्राफिटी छान आहे..
तिसरी विशेष आवडली :D

नावात काय आहे? म्हणाले...

सगळेच पुणेरी दिसता! :P

नावात काय आहे? म्हणाले...

सगळेच पुणेरी दिसता! :P