शुक्रवार, मे ०४, २००७

'स्वयं' पाक

माझ्या स्वयंपाकांच्या प्रयोगांना अखेरीस काहिसे यश लाभले.

मला स्वयंपाक करता येत नाही हे विदारक सत्य आहे. म्हणजे तसा वरण-भात करता येतो. चहा-कॉफी, आमलेट, भुर्जी इ. लोअर के.जी.तले प्रकारही मी ब-यापैकी करत असतो. शिरा नक्की जमतो. पण हे झाले सगळे पेशल पदार्थ. रोजच्या जेवणात हवी असणारी भाजी मात्र मला काही केल्या जमत नसे. करपणे, जळणे, अर्धी-कच्ची राहणे, पूर्ण कच्ची राहणे, धूर येणे, मीठ कमी होणे, मीठ जास्त होणे, मीठ विसरणे, मसाला विसरणे, मसाला न लागणा-या भाजीत मसाला घालणे, बेचव ते अति-मसालेदार चवी उतरणे, इ.इ. अनेक अपयशांनंतर काल पहिल्यांदा माझी भाजी-मोहिम ब-यापैकी सफल झाली. म्हणजे, वालाच्या शेंगांची, चविष्ट झालेली भाजी मी चक्क संपवू शकलो!

पदार्थ स्वतः शिकून, प्रयत्नपूर्वक बनवून, मग स्वतःच खाता आला तरच त्याला 'स्वयं' पाक असे म्हणता येते याची आता खात्री पटली आहे.

Adidas च्या "Impossible is nothing" जाहिरातीत दाखवतात तसे समाधान शेवटी मिळाले! ही पहा:

५ टिप्पण्या:

Nandan म्हणाले...

:D. tuzaach juna 'paak'kRuteechaa vinod aaThavala.

Yogesh म्हणाले...

lol @ comment

अनामित म्हणाले...

उत्तप्पा आणी मी, स्कोर आहे २-०. I know exactly what you mean - the video does help!!! :)

Ajit म्हणाले...

नंदन, मलाही आठवला तो!

Sheetal Kamat म्हणाले...

LOL :) :)