गुरुवार, मार्च २२, २००७

नोकरीचे सार्थक

कुणीतरी म्हटले आहे, (कुणीतरी नाही, मीच), "नोकरी म्हणजे आयुष्याला अर्थ देणारी गोष्ट!". सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या कामगिरीचा सखोल अभ्यास करून आमच्या कंपनीने शेवटी प्रगतीपुस्तक हाती ठेवले तेव्हा हा अर्थ अधिक गडद झाल्याचे पाहून समाधान वाटले!

अर्थात त्याचबरोबर नव्या जबाबदाऱ्या सोपवून आमच्या बॉसने नव्या अपेक्षा पुढ्यात ठेवल्या आहेतच, हे वेगळे सांगणे न लगे. या नव्या आव्हानांना सामोरे जाऊन जमेल त्याप्रमाणे बॉसच्या या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न तर असेलच, पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर असलेला विश्वास स्वतःलाच सिध्द करून दाखवणे. त्या जोरावरच इतरांच्या अपेक्षा पूर्ण करता येतील. आणि ते एकदा जमले, तरच नोकरीचे सार्थक झाले असे म्हणता येईल!

२ टिप्पण्या:

Sagar म्हणाले...

congrates !!

अनामित म्हणाले...

All the best n congo!
-sakshi