मंगळवार, फेब्रुवारी १३, २००७

ताई माई आक्का!

Vote for me!

"कुणी ऐकायला असो वा नसो, कीर्तनकाराने आपले कीर्तन करीत रहावे" अशा न्यायाने मी लिखाण करीत गेलोय खरा, पण आता तुमच्या पसंती-नापसंतीची पावती घेण्याची वेळ आली आहे असे दिसते.

कुण्या भल्या माणसाने indibloggies.com या वेबसाईटवर "उत्तम मराठी ब्लॉग" या वर्गवारीमध्ये "॥उगाच उवाच॥" ची शिफारस केलेली पाहून आनंद वाटला. त्या भल्या माणसास धन्यवाद. नियमित/अनियमित, नियमितपणे अनियमित आणि अनियमितपणे नियमित अशा सर्व प्रकारच्या उगाच उवाच वाचकवर्गाने/या वाचकवर्गाच्या स्नेहीपरीवाराने/इ. इ.नी या निवडणूकीत आपली मते नोंदवली तर उत्तम!

पंचायती राज मध्ये मतदानास फार महत्त्व आहे हे आपण जाणताच. या ब्लॉगलाच मत द्या अशी जाहीरपणे विनंती करत असलो तरी खाजगीतली गोष्ट म्हणून असेही सांगतो, की दुसरेही एकाहून एक सरस, सुंदर ब्लॉग तुमच्या वाचनात असतीलच. त्यापैकी तुम्हांस सर्वांत आवडणाऱ्या (आणि प्रथेप्रमाणे - फार अवघड आहे हो यांच्यातून सर्वोत्तम ब्लॉग निवडणे - असे म्हणावे लागत असले तरीही) ब्लॉगला आपण निवडून द्या अशी 'विनम्र' विनंती.

आणि हो, लक्षात असू द्या -- हे मतदान फक्त २० फेब्रुवारीपर्यंत खुले आहे, तेव्हा त्वरा करा!

असो. आता रिक्षावाले, वर्तमानपत्रे, मोठमोठी बॅनर रंगवणारे, कर्णेवाले, हॅंडाआउट छापणारे यांच्या मागे लागतो. फार मोठे काम निवडणूका म्हणजे...!

३ टिप्पण्या:

सहज म्हणाले...

wish you all the very best !!

Milind म्हणाले...

The site is http://www.indibloggies.org/

(not indibloggies.com)
मी तो भला माणूस नाहीये.. मी असे म्हणत नाही की मी भला नाहीये :)

असो. शुभेच्छा! मी सर्व blogs वाचून मगच मतदान करणार आहे :)

अनामित म्हणाले...

Can u send me exact link for voting. I want to vote for you :)

- Sagar