गुरुवार, सप्टेंबर २८, २००६

आई गं!

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट.
कोण्या एका गावात रामू नावाचा धोबी होता.
त्याच गावात मोती नावाचा (अर्थातच?) एक महान कुत्रा होऊन गेला.
व्रात्यपणा मोतीच्या रक्तात उपजतच होता म्हणा ना.
रामूला छळणे हे एकमेव ध्येय घेऊनच मोती जणू या जगात आला. आणि गेलाही.
सोनू नावाच्या मांजरीचा पाठलागच कर.
कुठे काळू नावाच्या कावळ्याच्या मागेच काय लाग.
अशा सगळ्या खोड्या करत मोतीचा दिवस कसा झकास जायचा.
रामूची कपडे धोपटायची वेळ झाली की मागून मोती शेपटी हलवत निघालाच समजा.
नदिकिनारी पोहोचल्यावर भिजवलेले कपडे रामू एकेक करून धोपटायला लागे.
उरलेल्या कपड्यांची काळजी घेणे मोतीचे काम.
टॉवेलच्या गुंडाळीला हाडूक समजून चावणे हा मुक्त मोतीचा छंद.
सगळे कपडे उपसून झाल्याशिवाय चांगले धुतले जात नसावेत, असेच काहिसे होते.
एके दिवशी शांत अशा सकाळी रामूचे कपडे धुणे सुरु असताना मोतीला काय झाले कोण जाणे.
एकेक करून तो सगळे कपडे घाटावरून दुसरीकडेच नेऊ लागला.
अशा वेळी रामूने एकच आरोळी मारली.
मोतीने अगदी प्रामाणिकपणे रामूची आज्ञा पाळली (अहो आश्चर्यम!)
सगळे कपडे उपसून पलिकडे नेण्याची जणू प्रतिज्ञाच केलेला मोती.
लगेच अचानक शेपटी घालून निमूटपणे तिथून पसार झाला.
असे काय म्हणाला असावा रामू?
तुम्हाला उत्सुकता असेल, तर खाली highlight करा.
तुम्हाला उत्सुकता नसेल, तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा.
एक डोकेदुखी तुम्ही टाळलेली असेल!

इथे: "कुत्ते कमी ने!"

२ टिप्पण्या:

vinchurkari म्हणाले...

उत्सुकता! काय म्हणाला रामू?

Deepika म्हणाले...

kay mhanala ramu motila?? plez sanga khup utsuk aahe aaikayala