शनिवार, सप्टेंबर २३, २००६

ज्वालामुखी

टी.व्हीवर ज्वालामुखीबद्द्ल एक कार्यक्रम लागला होता. कोलंबिया देशातल्या गॅलेरास या जिवंत ज्वालामुखीचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांचा एक ग्रुप जातो आणि नेमका त्याच वेळी तो ज्वालामुखी आग ओकू लागतो. दुर्दैवाने त्या ग्रुपमधल्या सहा संशोधकांना प्राण गमवावे लागतात. या सगळ्याचे थरारक चित्रण त्या कार्यक्रमात दाखवले होते.

"मी झोपतो करून हिमालयाची उशी" या धर्तीवर "मी पेटवतो विडी ज्वालामुखीच्या आगीत" अशी बढाईखोर कल्पना तो कार्यक्रम बघितल्यावर कराविशी वाटली एवढेच!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: