शुक्रवार, ऑगस्ट १८, २००६

संसार आणि पाला

काल TV वर बातम्यांमध्ये अण्णा हजारेंच्या आंदोलनाबद्द्ल सांगत होते. मुलाखतकाराने त्यांच्या उपोषणाबाबत विचारले असता, ते त्यांच्या पेशल हिंदित उत्तरले,

"पहले भी वे आश्वासन दे चुके हैं। अपना अनशन छोड दो फिर बातें करेंगे कहा था। क्या हुआ? कुछ भी नहीं। उन्होने अपना आश्वासन नहीं पाला।"

[...]

इत्यादी इत्यादी.

पूर्वी रेडिओवर आशा भोसलेंच्या मुलाखतीत ऐकलं होतं - " हॉं। वो दिन बडे मुश्किल के थे। मैं संसार कर रही थी।"

[...]

इत्यादी इत्यादी.
ऐकून मजा वाटली इतकेच!

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

अण्णा हजारेंच्या काऱ्याची तुम्हाला दखल घ्यावीशी वाटली नाही परंतु त्यांच्या हिंदी भाषेतील चुका मात्र तुमच्या काकदॄष्टीने टिपल्या. ह्यात दुर्दैव अण्णांचे, तुमचे की समाजाचे ह्याचा विचार करतोय. की तुमची टिप्पणी समाजमनाच्या सध्याच्या सवंग मनस्थितीची द्योतक समजायची?

Ajit म्हणाले...

Anonymous,

कदाचित आपल्या नजरेखालून माझे "ऐकून मजा वाटली इतकेच!" हे वाक्य (सोयीस्करपणे?) निसटून गेले असावे.

मा. अण्णा हजारेंच्या काय किंवा आशा भोसलेंच्या काय, कार्याविषयी मी काहीच भाष्य केले नव्हते. हा लेख त्यांच्या कार्याचे कौतुक/टीका करण्याविषयी नव्हताच. त्यांच्या हिंदी भाषणामध्ये मराठी शब्द असा विसंगत आल्याने कशी गंमत वाटली त्याबद्दल होता. असो. अनामिक राहून सद्य समाजाच्या "सवंग" विचारसरणीवर तोफा डागणाऱ्यांच्या प्रतिक्रियांना किती मान द्यावा हे ज्याने त्याने ठरवायचे, नाही का?