सोमवार, जून २६, २००६

व्हायब्रेटर मोड

प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द हवाच का, यावर चांगली चर्चा रंगू शकेल. विशेषतः तांत्रिक इंग्रजी शब्द मराठीत रुपांतरीत करायचे ठरवले तर मोठा 'प्रॉब्लेमच' आहे; पण असं होऊ शकतं का - की इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द हा इंग्रजीतच असेल? गोंधळलात ना? आपण एक उदाहरण पाहू:

मोबाईल फोनचा व्हायब्रेटर मोड ही काय थरारक चीज आहे हे आपल्याला ठाऊक आहेच. माझे या "व्हायब्रेटर" शब्दाचे मराठीत भाषांतर, "कंपनी" हे कसे काय वाटते?

:-)

१० टिप्पण्या:

Milind म्हणाले...

बरोबर,कधीकधी असे भाषांतर म्हणजे एक द्रविडी प्राणायामच होतो.

भ्रमणध्वनीवरून आठवले,
तुझ्या अनुदिनीवर भ्रमणध्वनीक्रमांक प्रकाशित करण्याचे काय बरे कारण?
उद्या यंत्रे तो वाचुन नको असलेल्या जाहीरातींचे त्यावरही करतील प्रसारण!

अनामित म्हणाले...

The mobile was configured to be in the vibrator mode. याचे भाषांतर "भटक्या उचंबळी लयीवर ठेवला होता" असेही करता येईल.

Ajit म्हणाले...

शैलेश, अजून एक गंमत, तुझ्या या मराठीत केलेल्या भाषांतराचे पुन्हा English मध्ये भाषांतर केले तर ते, "The tramp was kept on vibrating tempo" असे होईल :-)

सहसा पायी चालणा~या tramp ला अचानक टेंपोत कोणी lift दिली हासुद्धा एक valid प्रश्न आहे. नाही?
---

बा मिलिंदा, प्राणायाम द्रविडी असतो की द्राविडी? सध्या क्रिकेटमय झालेला दिसतोयस :-)

अनामित म्हणाले...

हा हा हा, सही कल्पना आहे!

अनामित म्हणाले...

पण मी काय म्हणतो, प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द तयार करण्याचा अट्टहास कशाला? व्हायब्रेटरचं 'कंपक' असं बारसं करा किंवा 'कंपनी', लोकं त्याला 'व्हायब्रेटरच' म्हणतील!

Milind म्हणाले...

मी आशिषबरोबर सहमत आहे.
Firefox ला काय म्हणायचे- अग्नीपंखधारी कोल्हा?
आणि Apple iPod ला?
:)

Ajit म्हणाले...

एक मिनिट एक मिनिट, I guess you guys missed the pun! 'कंप'नी

And I guess you guys also missed the smiley at the end of the post...

Milind म्हणाले...

'कंप'नी= 'कंप'knee काय?

धनंजय देव म्हणाले...

iPod, किंवा firefox ही त्या त्या वस्तुंची व्यापार च्न्हे आहेत, त्यामुळे त्यांचे भाषांतर करणे याग्य नाही, पण vibrator mode चे करु शकतो, "कंपन सरणी" कसे वाटते ?

अनामित म्हणाले...

mazya mate thartharat ha shabd ekdam thik aahe. janvtat kamp mala hi maze sir samor asstana