मंगळवार, जून २०, २००६

(शब्दाला) शब्द!

मी मराठीचा (दुरा)भिमान बाळगणारा माणूस नाही. मराठीचा अस्त होतोय का इत्यादी चर्चांमध्ये तर मला बिलकूल रस नाही. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विकासाबरोबरच विकसित झालेली अशी आपली मराठी भाषा आहे. आजच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात, विशेषतः तांत्रिक वापरासाठी मराठीचा दुराग्रहाने केलेला वापर हा क्लिष्टताच वाढवतो, आणि त्याचं वाचन उगीचच अवघड करून टाकतो असे माझे प्रामाणिक मत आहे. प्रत्येक इंग्रजी/हिंदी शब्दास मराठी प्रतिशब्द हा हवाच का हा चर्चेचा विषय ठरेल. इंग्रजीत "जानवे" यास प्रतिशब्द नाही. तसेच मराठीत opera ला चपखल शोभेल असा शब्द नाही. आणि blog ला तर नाहीच नाही. हे सत्य आहे!

असे सगळे असताना, दिवसेंदिवस इंग्रजीचा/हिंदीचा बोली भाषेत वापर वाढत असताना काही शब्द, किंवा वाक्प्रचार हळूहळू वापरातून कमी होताना दिसतात. भाषेच्या जीवनातली तिही एक phase असावी. गंमत म्हणून का होईना असे काही आडवळणी शब्द आठवले की ते मनापासून वापरावेसे वाटतात. त्यापैकी असे काही शब्द:

खुशालचेंडू
धटिंगण
उडाणटप्पू
ओशाळवाणे
हडेलहप्पी
मयत
तांडेल

Update: आणखी काही-
डच्चू, मुक्रर, स्त्रीलंपट, बडगा, उचलबांगडी, त्रेधातिरपीट, ऐसपैस इ.

इत्यादी इत्यादी. तुम्ही असे काही शब्द सुचवाल?

८ टिप्पण्या:

Milind म्हणाले...

बरेच असतील, सध्या एक आठवतोय:
वायफळ
याचेही कधीतरी एक Wiki Page बनवायला हवे

Nandan म्हणाले...

पटांगण
झुरणे (उदा. Computer झुरला आहे.)

अनामित म्हणाले...

हमरीतुमरी, झणझणीत

Sumedha म्हणाले...

नंदन, "Computer झुरला आहे" मस्तच!

झाकोळणे, भंजाळणे, वाभ्रट...

अजित, मी सहमत आहे. नको तिथे मराठी वापराचा आग्रह धरण्यापेक्षा आपल्या आवडीने, इतरांशी संवाद साधण्यासाठी, साहित्य, कला यांसाठी भाषा जिवंत ठेवणे महत्त्वाचे, आणि तशी ती राहतेही. या बाबतीत परवा डॉ. मोहन आगाशे म्हणाले ते पटले : भाषा बदलत जाते त्याबद्दल खेद कशाला करायचा? आपण आज जी मराठी वापरतो, तिचे स्वरूप प्राचीन मराठीपेक्षा खूप वेगळे आहे, म्हणून काही ती कमकुवत नाही!

अनामित म्हणाले...

भाषा बदलत जाते त्याचा खेद नाही, पण ती ज्या दिशेने बदलते आहे त्याचा मात्र खेद आहे. फक्त जुनेच सर्वमान्य शब्द वापरावेत असे म्हटले, तर नवीन संकल्पनांचा भाषेत शिरकावच होणार नाही, आणि मग मराठीत स्मृतिरंजनादेखील (nostalgia) काहीही उरणार नाही.

शब्द वापरूनच प्रचलित होतात. अवघ्या साठ वर्षांपूर्वी मराठीत Mayor, cheque, treasurer ला प्रतिशब्द नव्हते. आज आपण महापौर, धनादेश, कोषाध्यक्ष हे शब्द सर्रास वापरतो. प्रयत्न केल्यास आपल्यालाही तांत्रिक संकल्पनांसाठी सोपे शब्द का तयार करता येणार नाहीत ?

नवीन शब्दांच्या उपस्थितीत संवाद साधायला अडचण जाऊ नये म्हणून सध्या तरी कंसात इंग्रजी शब्द लिहूयात.

गेल्या ३-४ महिन्यातच ब्लॉग ला अनुदिनी हा शब्द चांगलाच रूढ झाला आहे. नवीन तंत्रज्ञान समजणाऱ्या मराठी शिलेदारांनी तो शब्द वापरायलाा हवा.

शब्दभांडाराला भेट द्या.

Parag म्हणाले...

Ajit, I agree. Kalach me Vishal la dekhil hyachavarun comment takali hoti. Blogs vachtana lakshat ala ki lokanna pratyek English shabdala Marathi Shabda vaparaycha havyas ahe...Ani baryachda tyachamule likhan atishay avghad hote. (Yahoo Niropya, Google Bolkya hi kahi udaharne) Jya goshtinchi olkhach English madhun zali tyanna Marathi shabdancha attahas ka? Ajun ek vachanat alela shabdaprayog mhanje "Padvyuttar shikshanachi shala" mhanje Graduate school. Jari US madhe Graduate "school" mhanat asale tari apan marathit shala ha shadbaprayog tya arthani karato ka? Mag jasacha tasa bhashantar karaychi garaj kay?
Milind, anudini ha shadba avadala. Pan mag anudini madhe apan aplya manatle vichar lihit asato. Apan vichar karatana evhade clishtha technical shabda vaparato ka? Me tari nahi. But I really appreciate your efforts of creating shadabhandar.
Anyways, Ajit you shared my thoughts. :)

अनामित म्हणाले...

पराग,

अजितने एका महत्वाच्या मुद्दयाला हात घातलाय, म्हणूनच चर्चा छान रंगतेय. (अजित, हा लेख तू मनोगत वर टाक, त्याची वाचकसंख्या खूप आहे.)

क्लिष्टता ही काळानुरूप बदलणारी गोष्ट आहे. ज्या संकल्पनांची ओळख इंग्रजीतून झाली त्याला मराठी प्रतिशब्द का शोधावा हे तुमचे मत विचार करण्यासारखे आहे. मग गझलेचा शोध उर्दूत लागला तरी सुरेश भटांनी मराठीत गझल का लिहिली ? जयंत नारळीकरांनी विज्ञानकथा का लिहाव्यात ? मराठी वृत्तपत्रे तरी का असावीत ? कागदाचा शोध चीन मध्ये लागला, म्हणून मराठीत बोलताना आपण zhi हा चिनी शब्द वापरावा का ?

आजच्या वैश्विक युगात (globalization) सगळे निर्बंध हळूहळू तुटत असताना, भाषेचा अडथळा का रहावा ?

उगाच विशेषनामांना मराठी शब्द शोधायला माझा विरोध आहेच. उगाच मायक्रोसॉफ्ट ला अतिसूक्ष्ममृदु का म्हणायचे ? म्हणूनच संकल्पनांसाठी प्रतिशब्द हवेत, सरसकट कुठल्याही शब्दासाठी नकोत.

(ता. क. माझ्या आधीच्या प्रतिसादात "स्मृतिरंजनादेखील" असे चुकून आले आहे, त्याऐवजी "स्मृतिरंजनाखेरीज" असे हवे.)

- मिलिंद

Parag म्हणाले...

मिलिंद, तुमच्या मताशी काही प्रमाणात सहमत आहे. पण तुम्ही दिलेल्या काही उदाहरणांशी नाही. :) गझल जरी सुरेश भटांनी मराठीतून लिहीली तरी त्याला मराठीत देखिल "गझल" असेच म्हंटले जाते. (हा बहूतेक उर्दू शब्द आहे. माझं जरा confusion आहे ह्या बाबतित) म्हणजे संकल्पना उचलली तरी नाव तेच राहीले. नारळीकरांच्या कथांमधे ही संकल्पना समजून घेताना भाशेची अडचण येत नाही कारण जिथे आवश्यक आहे तिथे English शब्द वापरलेले असतात. मराठी व्रूत्तपत्रे असावीत पण त्यातही रोजच्या वापरातले इतर भाशांमधले श्ब्द वापरले तर बिघडलं कुठे? आजच्या वैश्विक युगात (globalization) सगळे निर्बंध हळूहळू तुटत असताना भाषेचा अडथळा नसावा.. समजायला सोप्प जाईल अश्यारीतीनेच संवाद साधला जावा.
(P.S. Please fogive my poor marathi typing. )