शनिवार, मार्च २५, २००६

उंट!


पुण्यात सोमवार पेठेतल्या एका रस्त्यावरच्या खड्ड्यात एक आख्खा उंट पडल्याची बातमी वाचून हसून हसून पुरी वाट लागली!

बुद्धीबळातला उंट खड्ड्यात पडला असता तर एक वेळ फारसे काही वाटले नसते. पण भर पुण्यात एक खरा उंट रस्त्यावरच्या खड्ड्यात तब्बल दोन तास अडकून पडतो, आणि त्यास वर काढायला आग्निशामक दलाला पाचारण करावे लागते ही अत्यंत उच्च दर्जाची बातमी आहे. कोण म्हणतं की लोकल बातम्यांमध्ये करमणूक नसते म्हणून!

शहाण्या माणसाने (उंटावरुन किंवा otherwise) त्या रस्त्याच्या वाटेला न जाणे हेच संयुक्तिक :-)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: