शुक्रवार, ऑगस्ट १९, २००५

बदल

मी बदलतोय - हे मला दिसतंय; जाणवतंय. किंबहुना मी आता बदललोय.

आठवतो तो माझा लेख, "काल आज आणि उद्या", पाच-सहा वर्षांपूर्वी लिहिलेला. आणि त्यानंतर लिहिलेल्या कितीतरी कविता, लेख आणि कथा. या सगळ्यांनी मला घडवलंय. यांना घडवत असताना मी स्वतः उमलत गेलेलो आहे.

मला माझे चित्र जाणून घ्यायचे असते तेव्हा मी माझे लिखाण वाचत बसतो. माझेच न जाणे कितीतरी नवे रंग मला सापडतात आणि आश्चर्य वाटतं - प्रत्येक वेळी वाचतो तेव्हा तेव्हा नवे रंग? कमाल आहे.

पण हे सगळं साहजिक असतं.

प्रत्येक वाचनानंतर मी स्वतः आणखी बदललेला असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: