सोमवार, नोव्हेंबर ०८, २००४

शून्य आणि अनंत

मी सकाळी लवकर उठतो - रोज सकाळी
प्रातर्विधी - स्नान सगळं आलंच त्यानंतर
नाश्ता - व्रुत्तपत्रं - वेळ जातोच
अभ्यास वाचन lectures - assignments,
रोजची official कामे
documentation - reports हजारोंनी
काही व्यर्थ तर काही सार्थ

गप्पा-टप्पा, हास्य-विनोद - बरेचसे
निरर्थक काही हास्यास्पद
वाद-विवाद, तत्त्वं - बरीचशी तोंडी लावण्यापुरती
त्रागा-राग-मत्सर-हेवा आणि हो -
आदरसुद्धा.
आळस-कंटाळा, निरीच्छा - पण थोडी
शर्थसुद्धा

नवे संकल्प, जुन्याच रीती, आधुनिक पद्धती;
पण पुराण्याच व्रुत्ती.
नवे द्न्यान, अद्न्यानाचेही द्न्यान, काही नवे
पण बरेचसे जुनेच

अपुरा पडणारा उत्साह, पण खापर मात्र
"अपुर्या" पडणार्या वेळेवर!
मर्यादा - काहीशा स्वतःच घालून घेतलेल्या
पण दुसर्यांनी लादलेल्यांवर जास्तच राग

मी जगतो - असाच, सदॆव. एका क्षूद्र शून्यासारखा!
मात्र अनेकदा ही शून्यत्वाची जाणीव टोचणी लावून जाते
चांदण्यांनी बहरलेल्या आकाशाकडे बघतो तेव्हा.
आभाळाच्या अनंततेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो -

आणि अत्यानंदाने आभार मानतो - कोणाचे? ठाऊक नाही.
कशासाठी? मला विचार करण्याची क्षमता दिल्यासाठी -
माझं या अनंत जगातलं शून्य अस्तित्व या जगाच्या randomness चा
भाग असल्याची जाणीव करून दिल्यासाठी.
त्याचबरोबर शून्याशिवाय अनंत अपूर्ण आहे याचीही जाणीव करून दिल्यासाठी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: