ग्रीकांची नगरी । जाहली अमर ।
बघण्यास खेळ तो । लोटतो सागर ॥
युद्धेही थांबती । जळे एकच ज्योत ।
विविध स्पर्धांची । नौबत झडे ॥
मनी एकच ध्यास । ऐकावे राष्ट्रगीत ।
सुवर्णाचे पदक । देशास अर्पावे ॥
तारा तो एकच । सदैव समोर ।
मनात विश्वास । कायम वसे ॥
कधी अपयश । त्यांस न येई ।
ज्याने पराक्रम । थोर केला ॥
पराक्रमा अंती । पाडाव जरी जाहला ।
जीवनी त्याचा । तो विजयच असे ॥
जिंकेल जो मना । त्यास खेळाडू माना ।
नित्य खेळ मांडा । अजित म्हणे ॥
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा