सोमवार, ऑगस्ट १६, २००४

ती

स्वप्नवत संध्याकाळी आज हवेत गारवा
पावसाची सर आणि मनात मारवा
स्वच्छंद मनास पडला जगाचा विसर
समोरच दिसली ती, प्रतिमा जरा धूसर

मी होतो माझाच तरी कसा पडला विसर
कानांवर सूर पडती, स्थिर ना माझी नजर
दूर तशी बरीच ती पण मी होतो जवळ
तिच्या नजरेपार, परी जाणवे श्वासांची हूरहूर

हलकेच स्मित कधी ओठ विलग करी
हळूच सावरे अन बट ती खट्याळ आवरी
तासात अवघ्या एका ठोके किती चुकले
जाणतो मीच सारे क्शणही केव्हा थबकले

तप्त सूरांची धार थिरकत ताल कोसळे
वार्याची घेत सलामी दिवसही आता मावळे
अबोल काळ्या डोळ्यांतूनी हळूच ती लाजे
माझा जाई जीव - कुशीत भॆरवीच्या मॆफिल गाढ निजे

तिचे दूर असणे - अन माझे तिच्या गावीही नसणे
तरीही "भाग्यवंत मी" माझ्या मनाचे मला सांगणे
कधितरी असेन मी कुणाचा तरी प्रिय
या जिवंत रात्री मग हळूच दिनकराचे उगवणे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: