शुक्रवार, ऑगस्ट ०६, २००४

बगळे

त्या रहदारीच्या रस्त्यावर
भव्य ग्रंथालयाच्या आवारात
हिरव्या कंच हिरवळीवर विहरतांना दिसतात - बगळे !

पांढर्या शुभ्र त्वचेहूनही
स्वच्छ मनाने स्वच्छंद बागडतात
जगाच्या रंगीत कोलाहलापासून दूर
शीतल छायेत पहूडतात - बगळे !

रोजच्याच झालेल्या धकाधकीच्या आयुष्यात
तीच तीच वळणेही रोजचीच
मात्र आपल्या नुसत्या असण्यानंही
तप्त उन्हात बरसून जातात - बगळे !

तेच बगळे, तोच रस्ता, तेच वळण,तीच वेळ,
मात्र रोज नवा अनुभव
त्या बगळ्याच्या उमद्या नजरेतली ओळख
मला सांगून गेली ---माझ्याइतकेच वाटेकडे डोळे लावून असतात ते - बगळे !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: