सकाळी उठलो --
दात घसतांना जाणवलं की हे दात माझे नव्हेतच
अहो दातच काय, हातही माझा वाटेना मला !
सकाळी उठलो --
बघतो तर पहाटेचे पाच -- डोळ्यांवर विश्वास बसेना -- नव्हे,
ते डोळे माझे नव्हतेच -- अन्यथा धूसर, अस्पष्ट का दिसावे ?
न्याहरी करतांना जाणवलं मला ब्रेड ची भूक लागलीय आज --आयुष्यात आधी कधी ब्रेड ची चव चाखली आहे मी? पुन्हा तेच! जीभ तरी माझी कुठे होती?
ब्रेड-टोस्ट हा हा ! कधी ऐकलं आहे तुम्ही?
डोळ्यांवर थोडा ताण देऊन दिवसाची अशी अवेळी सुरुवात केली खरी
न्याहरीला केळी आणि दूध ? छे--!
जन्मात कधी दूध इतकं आवडेल असं वाटलं नव्हतं मला !
चाळा म्हणून वर्तमानपत्रावर नजर टाकली, तर स्फोटांच्या बातम्या! जगातल्या सार्या प्रश्नांवर एकच उत्तर - चाबूकशाही - साले, लोक सुधरणार नाहीत त्याशिवाय ---
क्क्काय??? 'मी' हे बोललो? माफ करा हं काहीतरी चूक झालेली दिसतेय
सगळं जग मझ्याभोवती फिरतंयसं वाटतंय - काय रक्तरंजित तो फोटो! --
छे छे पण हे काय, माझं शरीर एवढं कमकुवत का वाटतंय?
माझं शरीर ?
हं - हळुहळू उमजतंय मला - हे स्वप्न तर नव्हे ?
आउच!
चिमटा चांगलाच जाणवला मला !
मी मीच आहे ना ? पण काय हा विचार ?
आत्ता कळतंय - मी मी नव्हेच -
पण मी 'मी' नाही तर मग मी कोण?
हं - सगळं हळुहळू ध्यानात येतंय - हे स्वप्न नव्हेच
- आणि हा मी सत्यातला मीही नव्हे - हा मी म्हणजे माझ्या स्वप्नातला मी वाटतोय
नाही खात्रीच झालीय आता!
स्वतःबद्दलचं असंच एक स्वप्न मी पाहिल्याचं आठवतंय मला -
त्यातला मी म्हणजे अगदी आजच्यासारखाच मी - yes !
अगदी मनातल्यासारखा!
किती प्रयत्न केला होता मी बदलण्याचा - चांगल्यासाठी की वाईटासाठी?
कोणास ठाऊक? - पण काय हा चमत्कार -
आता प्रयत्नाशिवायच सफलता मिळाली - असं वाटतंय खरं!
पण आता मला हे स्वप्न (की सत्य?) तितकसं आवडत का नाहिये?
पूर्वीचाच मी चांगला होतो का? पण छे!
जर पूर्वीचा मी चांगला भला होतो तर मी तेव्हा हे स्वप्न का पाहत होता?
हं! जेव्हा जे जवळ नसतं तेव्हा ते हवहवंस वाटतं - हा नियमच खरा!
कदाचित माझं हे स्वरूप दोन दिवसांनंतर पुन्हा कंटाळवाणं वाटेल -
की मला पुन्हा पहिल्यासारखा मी होण्याची स्वप्नं पडतील?
हं! आत्ता बारीकसारीक गोष्टी आठवताहेत!
त्या स्वप्नांमध्ये मला अजुनही काही गोष्टी दिसायच्या -
कुंभकर्णाला स्वप्नांतही पुन्हा झोपच यायची म्हणे! हा हा !
हं! आत्ता बारीकसारीक गोष्टी आठवताहेत!
त्या स्वप्नांमध्ये मला अजुनही काही गोष्टी दिसायच्या -
कुंभकर्णाला स्वप्नांतही पुन्हा झोपच यायची म्हणे! हा हा !
सकळी उठलो - पातर्विधी कसे झटपट उरकले -
आणि आज कसं प्रसन्न वाटतंय - ते स्वप्नं आज मला पडल्याचं स्मरणात नाही -
छे ! काय दचकून उठायचो मी रोज!
सकाळी उठलो - काय सुंदर सकाळ -
आणि प्रसन्न अनुभव -
अशा कितीशा सकाळी स्मरणात आहेत माझ्या ? तीन की चार?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा