रविवार, एप्रिल ०१, २००७

एप्रिल फूल

आज एक एप्रिल.

जगभर हा दिवस फूल्स डे किंवा मूर्खांचा दिवस म्हणून साजरा (!) केला जातो. "बघ तुझा कान पडला," पासून ते इतर अनेक स्तरांवरच्या गमती करून फिरक्या घेण्याचा हा दिवस. (भारताचा अव्वल दर्जाचा फिरकी गोलंदाज -- अनिल कुंबळेने कदाचित म्हणूनच कालच आपली निवृत्ती जाहिर करून घेतली असावी! असो.)


अशा पार्श्वभूमीवर मी काही गंमत केली तर ते फारच 'हे' म्हणजे अगदीच संधीसाधू दिसेल, म्हणून करत नाही; पण अजून एका गोष्टीकडे लक्ष वेधतो, ती म्हणजे, एप्रिल फूलचा दिवस आणि आर्थिक नववर्षारंभ हा एकाच दिवशी होतो!

सुजाण वाचक यावरून काय निष्कर्ष काढायचा तो काढतीलच :-)

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

Perhaps that is in indication of the fooling to be done all year along! :)