बुधवार, डिसेंबर २७, २००६

नशिबाचा हिरा

काही ठराविक व्यक्तिंना नशिब ऊर्फ प्राक्तन महोदयांचा वरदहस्त लाभलेला असतो. आता मी म्हणतो त्या महाशयांचीच गोष्ट बघा ना!

जन्म गणेशचतुर्थीचा. शालेय शिक्षणासाठी कुठेही देणगी द्यावी लागली नाही. एकदाही गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षा झालेली नाही. नंतर कॉलेजच्या ऍडमिशनसाठी काहिही अडथळा आलेला नाही. त्याने काही म्हणावं आणि तसंच घडावं. आज शारजात भारताचा दारूण पराभव होणार, कॉंग्रेस पक्षाची लाकडी खुर्ची डलमळीत होणार की नाही, पाऊस पडणार की नाही, सगळं कसं याला नेमकं ठाऊक. कधी अंदाज म्हणून चुकलेला नाही. शेयर बाजारात याचा अत्यंत उपयोग. कुठला शेयर वधारणार आणि कुठला गाळात जाणार याचा नेमका अंदाज बांधण्याची कला याला आत्मसात. महाराष्ट्र राज्य लॉटरी असो वा सिक्कीम राज्य लॉटरी तिकिट घेण्याचा अवकाश, त्याने कुठल्या नंबरचे तिकिट घेतले ते पाहूनच लॉटरी कंपनी लॉटरी काढते की काय असे वाटावे. असं सगळं हेवा वाटावा असं नशिब.

अलिकडच्या एका गोष्टीसाठी मात्र त्याला नशिबाची साथ गरजेची वाटली नसावी. एका प्रख्यात जवाहि~याने कुठलीशी स्कीम की काय काढली होती. "काही ठराविक रकमेचे दागिने खरेदी करा आणि नशिबवान असाल तर मोठं बक्षिस मिळवा," अशी काहिशी घिसिपिटी म्हणतात तशीच योजना होती. जाहिरात पाहताच आपल्या नायकाचे डोळे चमकले. पुढचा मागचा विचार न करता पुढची बस पकडून साहेब सराफाच्या पेढीवर हजर. काय ते एक-दोन हजाराचे दागिने खरेदी केले आणि योजनेत नाव नोंदवून टाकलं. मोठं बक्षिसही आकर्षकच होतं. २२ की २४ कॅरेटचा किमती हिरा! आता ते बक्षिस कोणीही हिरावून घेऊ शकत नाही अशा जरा जास्तीच आत्मविश्वासात महोदय परतले.

दोन आठवड्यानंतर त्या योजनेच्या नशिबवान विजेत्याचे नाव जाहीर होणार होते. आपले नायक आयुष्यभर नशिबवान ठरत आलेले असल्यामुळे हे बक्षिसही त्यांनाच मिळणार असा त्यांना स्वतःलाही विश्वास वाटत होता. परंतु, या स्पर्धेत मला नशिबाची मुळीच गरज नाही अशी दर्पोक्ती करून फुटक्या नशिबाचा फेरा ओढवून घेतात की काय अशीही शंका त्यांच्या आप्तमंडळींना वाटत होती. ठरलेले दोन आठवडे सरले आणि निकालाचा समय झाला.

आणि अहो आश्चर्यम्! २२ की २४ कॅरेटच्या हि~याचं पहिलं बक्षिस मिळालं ते आपल्या कथानायकालाच!

तर अशी ही बुधवारची कहाणी. काय म्हणता? फारशी रुचली नाही? काही हरकत नाही. ठीक आहे...

बघू या तर कोणास किती कळली ही कहाणी: कोणी मला आपल्या नायकाचे नाव सांगू शकेल काय? ओळखा पाहू!

हरलात? मग आता उत्तरासाठी खाली highlight करा.
---
-->"सदा! कारण? हिरा है सदा के लिये :-)"

३ टिप्पण्या:

yogesh म्हणाले...

असाच एक दुसरा पीजे आठवतो.
एकदा करीना कपूर, तुश्शार वगैरे सर्व जण इमारतीच्या गच्चीवर बसलेले असतात (कशाला??). तुश्शार व करीना वगळता सर्व जण लिफ्ट वापरून खाली येतात. हे दोघे मात्र पायर्‍या उतरून... का?

कारण: जीना सिर्फ मेरे लिए... ;)

अनामित म्हणाले...
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
अनामित म्हणाले...

sada

karan heera hai sada ke liye