मंगळवार, फेब्रुवारी २१, २००६

नाशिक शहर माहिती आहे का तुम्हाला?

नाशिकचे मध्यवर्ती बसस्थानक CBS या नावाने ओळखले जाते. तो reference धरलात, तर शरणपूर रस्त्याने सरळ canada corner कडे मोर्चा वळवायचा. डावीकडे पतंग हॉटेल लागेल- ते सोडायचं, मग पुढे कुलकर्णी बाग लागेल, तिथूनही पुढे जायचं. पुढचा डावा रस्ता सोडून मग त्यानंतरच्या डावीकडच्या गल्लीत शिरायचं. सरळ आत चालत गेलात तर डावीकडे मग एक architect's guild की काहितरी अशी एक इमारत दिसेल. तिथूनही अजून पुढे जायचं. उजवीकडे मैदान दिसेल - तसंच थोडं पुढे गेलात की मग तुम्हाला माझ्या शाळेची मोठी इमारत लागेले.

साधना - सम्रुध्दी - समता असे ब्रीदवाक्य आणि "महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित" "रचना विद्यालय" असं मोठं रंगवलेलं तुम्हाला दिसेल. हीच माझी शाळा.

पण हे सगळं फक्त space मध्ये झालं. "माझी शाळा" तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला time मध्ये प्रवास करायला हवा.

ती फक्त इमारत झाली. खरी शाळा तर माझ्या मनात आहे!

२ टिप्पण्या:

Amol (अमोल) म्हणाले...

:)

Shraddha म्हणाले...

Have you been to Rachana recently? तिथे भारताचा नकाशा अजुनही तसाच आहे. आणि माझ्या प्राथमिकमधे बांधलेला तो गैदरिंग कट्टासुद्धा. :)