शुक्रवार, जून ०३, २००५

आवाज नहीं चाहिये!

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र मंडळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. विलासराव देशमुख आले होते. त्यानिमित्ताने मंडळात गण-गवळण आदी कार्यक्रम सादर करण्याचे ठरले. मी नेमाने नारायण बनून sound system च्या mixer वर बसलो होतो. पुढ्यात भाषणांच्या फैरी झडत होत्या. अखेरीस मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची वेळ आली. अचानक मला जाणवलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा "आवाज बंद" करण्याची ताकद त्याक्षणी माझाकडे होती - पण त्यांचं बोलणं ऐकल्यावर आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून (त्यांच्या) सुदैवाने मला त्या दडपशाहीवादी ताकदीचा वापर करावासा वाटला नाही!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: