शुक्रवार, एप्रिल २२, २००५

भास्करास

कोवळ्या चैत्रपालवीला भाजून काढण्याचा तुझा राक्षसीपणा, हे भास्करा, तुला पचणार नाही.

गुलमोहोराचा बहरलेला लाल लाल पिसारा पाहून तुझी आणखीनच होत असेल लाही

तुझ्या तेजाचे दूत करत असतील ना जरी बेजार स्रुष्टीला, तरी---

त्याच उन्हांना परतवून लावाया, तुझ्यामुळेच होणार आहे मेघांची आर्द्र गर्दी.

असशील तू राजा या गगनाचा आज, तळपशील त्वेषाने, बरसतील धारा मात्र उद्या,

उभ्या स्रुष्टीला असे जाणीव या उद्याची - देती अवघे आव्हान, "मित्रा ओक रे तू आग!"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: