जोश तारुण्याचा | प्रतिभेची साथ |
नवनवी क्षितिजे | खुणावती ||
सोडुनिया वाट | सरळ धोपट |
स्वीकारुनि आव्हान | आलो बंगलोरी ||
परप्रांत परभाषा | निराळेच रंग |
भोजनाचे हाल | परी निर्धार अभंग ||
गर्दीत त्या साऱ्या | ओलावा शोधीत |
फिरलो शहरी या | उद्यानांच्या ||
एके दिवशी अवचित | संध्याकाळी रम्य |
झालो मी दाखल | युवा मध्ये ||
ओळख ना पाळख | बुजरा स्वभाव |
परी घेतले सामावून | युवांनी मला ||
माझाच विश्वास | बसे ना माझ्यावर |
नाटकात जेव्हा मी | लाविले दिवे ||
मग मी नाही | पाहिले वळून |
लुटल्या आनंदा | थांग नाही ||
गायन वादन | नाटक भ्रमंती |
तोडीच्या विनोदा | नाही आणि गणती ||
रम्य या शहरी | लाभले स्थैर्य |
जगण्याची जाणलो | सार्थकता ||
युवाची संगत | कायम लाभावी |
तुमच्यातलाच एक | युवा उवाच ||
(युवा मराठी संघ बेंगलोरसाठी)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा