शुक्रवार, डिसेंबर ११, २०२०

फेरफटका

 



नेहमीच्या वाटेवर फेरफटका मारतांना प्रत्येक वेळी ती वाट वेगळंच काहीतरी देऊन जाते. कधी जोराचा गार गार वारा, तर कधी तीक्ष्ण आणि थेट डोळे दिपवणारी सूर्याची तिरीप. पानगळीच्या दिवसात झुळुकेबरोबर झुलणारी लाल-केशरी पाने, आणि त्या रंगाशी स्पर्धा करणारे आकाश. एकदा का फांद्यांना निरोप देऊन सटकली की ती हजारो पाने कुठे शेवटी जातात हे एक कोडेच. दूरवर कधी काळ्या ढगांचा पसारा तर कधी उन्हात चमकणाऱ्या विमानाने सोडलेली शेपूट. 

अशा या वाटेवर रोज चक्कर मारतांना कितीतरी गोष्टी नकळत 'रजिस्टर' होऊन जातात. रोज नवीन! अर्थात रोज आपणही कुठे सेम असतो!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: