कधी फेसाळणारी कधी सरसावणारी
कधी थंडगार कधी बोचणारी
कधी आक्रमक कधी संथावणारी
कधी खेळकर अशी कधी खोडकर तशी
कधी वादळात भीजवणारी जोरदार
कधी वादळात भीजवणारी जोरदार
कधी उन्हात सुखावणारी आरपार
कधी येऊन येऊन नको नको वाटणारी
कधी जाता जाता फार फार रडवणारी
कधी भरतीची - स्वतःला लादणारी
कधी ओहोटीची - हक्कानेच मागणारी
कधी मी ती लाट - कधी तू किनारा
कधी तू ती लाट - आणि मी किनारा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा