शुक्रवार, जून २२, २००७

डॅरेन गंगा

रामनरेश सरवानला झालेल्या दुखापतीमुळे डॅरेन गंगाची (की गंगेची?) एकदम बढती झाली आणि त्याच्या गळ्यात कप्तानपदाची माळ पडली. मात्र शिव चंदरपॉल सोडला तर विंडीजच्या फलंदाजीचे तीन तेरा वाजले आणि मालिका ते तीन-शून्य असे हरले. कप्तानाच्या बॅटीला न भूतो न भविष्यति असा दुष्काळ पडला आणि ते पराभवाचे आणखी एक महत्त्वाचे कारण ठरले.

सांगण्याचा मुद्दा डॅरेन नसून गंगा आहे.

वर्षानुवर्षे आपले लोक पापं करीत आले आहेत आणि ती पातके धुण्याचे काम गंगामाई करत आलेली आहे. माझ्या मते तिच्या सिंधू नामक चुलतबहीणीला हे काम द्यायला हवे होते. का? तिच्या नावातच सगळे दडले आहे हो---

"सिन-धू!"

काय म्हणता?

४ टिप्पण्या:

Nandan म्हणाले...

:D. nireexaN chaangale aahe.

Mints! म्हणाले...

sin- dhoo ... sahi hai bhay ...

Yogesh म्हणाले...

sundar nirikshan

Anand Sarolkar म्हणाले...

>> "सिन-धू!" >>

Khi..Khi...Khi! sahi ahe funda!