मंगळवार, सप्टेंबर १९, २००६

हो का?

दुपारची निवांत वेळ. नुकतंच (जरा जास्तच) जेवण झालेलं आणि त्यामुळे सुस्ती आलेली. कामाच्या ढिगाऱ्यातून डोकं वर काढून बघायला वेळ नाही. सुस्तीमुळे कामाचा वेगही यथातथाच. अशातच फोन वाजतो.

अशा जड परीस्थितीत अस्सल पुणेकराला लाजवेल अशा स्वरात "कोSSणे?" असं म्हणावसं वाटतं; पण इलाज नसतो. विनम्रतेने, "हॅलो" असं म्हणावं लागतं.

"हॅलो? I am Rekha calling from ICICI bank"

"असं का? हा!हा! वा वा! छान छान"
"मी आपली काय सेवा करू शकतो?"
"काय? दरोडा पडला तुमच्या बँकेत? मग पोलीसांना कळवा. मला का त्रास?"
"चहा? नको हं. आत्ताच जेवण झालंय ना माझं..."
"अच्छा? मागच्या वेळी बिंदू म्हणून होती कोणीतरी- तिला कटवलं होतं..."
"बरं, मग?"
"काय हे? कधीपासून तुझ्याच फोनचीच वाट पाहतोय. किती उशीर हा!"
"रॉंग नंबरे हा"
"हूं. तू नोकरी बदललीस वाटतं!"
"छे छे, काहीतरीच काय. तुझं नाव माहित्येय मला - श्रीराजराजेश्चरीदेवी, हो ना?"

अशी अनेक उत्तर सुचून जातात. पण शेवटी अगदी मृदू आणि मवाळ भाषेत फक्त, "OK.." असं म्हणावं लागतं. तिचा हिरमोड करत शेवटी फोन ठेवावा लागतो. इलाज नसतो.

फोन करणे हे तिचं कामच; मान्य; पण मलाही मा-आ-आ-झं का-आ-म-अ अ-स-तं की-ई ना--आ--ई- ही--ही--ही!?

३ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

मी तुझ्या मताशी फार्फार सहमत आहे. एका पुणेकराला इतक्या सभ्यतेने वागायला किती त्रास होत असेल हे दुसरा पुणेकर जाणु शकतो!
मस्त लिहितोस!

Ajit म्हणाले...

Hang on.

मी पुण्याचा नाही! - clarification :-)

अनु म्हणाले...

Maja ali vachun.
Ya bhavanya/bhavane nemake amachya suttichya divashi dupari zopechya veli kase phone karatat kay mahit. Ani te pan landline var. Mobile asala tar nidan call konachaz ahe pahun reject tari karata yeto.